Advertisement

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी धावणार? विजय वडेट्टीवार यांनी दिलं स्पष्टीकरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंदच आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या भीतीनं लोकल बंद ठेवण्यात आली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी धावणार? विजय वडेट्टीवार यांनी दिलं स्पष्टीकरण
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंदच आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या भीतीनं लोकल बंद ठेवण्यात आली आहे. परंतू, लोकल बंद असल्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शिवाय, कोरोना पॉझिटिव्हिटी दराबाबत मुंबई लेव्हल १ मध्ये (Level 1) येत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार केला जाणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी स्पष्ट केलं.

याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई आजही लेव्हल ३ मध्ये आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तो धोका संपलेला नाही. लोकल प्रवास तातडीनं सामान्यांसाठी सुरू करणं शक्य नाही. काही जिल्ह्यांमध्ये आजही अतिशय चिंतेची स्थिती आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबतचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. परिस्थितीचा दरवेळी आढावा घेऊन प्रशासन निर्बंधांबाबत निर्णय घेईल.

मुंबईत सोमवारी कोरोनाचे ५२९ रुग्ण आढळले, तर १९ मृत्यूची नोंद झाली आहे. शहर उपनगरांत दिवसभरात ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महाराष्ट्रात (maharashtra) सोमवारी नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात ८ हजार १२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ७३२  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच २०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ३५४ झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १९ हजार ०४७ आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार २०५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ६८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार १५६ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६ हजार २६१ आहे. हेही वाचा -

घरोघरी जावून कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारचा नकार

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा