Advertisement

शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली!, आशिष शेलारांचा निशाणा

भाजपने केलेल्या आंदोलनानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आडून एका महिलेवर हल्ला करणं. यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली!, आशिष शेलारांचा निशाणा
SHARES

भाजपने केलेल्या आंदोलनानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आडून एका महिलेवर हल्ला करणं. यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली आहे.    

शिवसेना (shiv sena) भवनासमोर झालेल्या तुफान हाणामारीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजप (bjp) जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर माहीम पोलीस ठाण्याला पोहोचल्यानंतर आशिष शेलार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितलं की, युवा मोर्चाचे आमचे पदाधिकारी पोलिसांना सूचना देऊन आंदोलन करत होते. या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपून छपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणं, शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळेला सोनिया, वाड्रा आपला देव बनतात. पण तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे शिवसेनेचे दुष्मन होतात, हे आज या ठिकाणी दिसलं आहे.

हेही वाचा- शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, शिवसेना भवनासमोर राडा

या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. लपूनछपून पोलिसांच्या आडू भ्याड हल्ले कसले करता, समोरासमोर रणांगणात या, भारतीय जनता पार्टी तुम्हाला चारी मुंड्या चीत करायला तयार आहे. या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. एक महिला अक्षरा तेंडुलकर नावाची तिच्यावर सगळ्यांनी मिळून हल्ल करणं याचं उत्तर आम्ही देऊ. हिंदीत म्हण आहे, लाथों के भूत बातों से नही मानते, यानुसार शिवसेनेला आता याच भाषेत आम्ही उत्तर देऊ, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. शिवसेनेने याप्रकरणी चौकशीची मागणी उचलून धरली आहे. या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. 

शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथं दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमुळे दादर परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

(ashish shelar comment on raw between shiv sena and bjp at dadar shiv sena bhavan)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा