बाळासाहेब ठाकरेंना मुंबई लाइव्हचं अभिवादन!

  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज, गुरुवारी चौथा स्मृतिदिन. बाळासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या शिवाजी पार्कच्या मैदानात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनधी आणि ज्यांचं बाळासाहेबांवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही, अशा शिवसैनिकांची सकाळपासूनच रीघ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. बाळासाहेब ठाकरेंचा जन्म 23 जानेवरी 1926 रोजी पुण्यात झाला होता. 1966मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली आणि त्यापुढील इतिहास सर्वज्ञात आहे.

  बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना मुंबई लाइव्हचं नम्र अभिवादन.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.