Advertisement

राष्ट्रवादीच्या रंजना धानुकांचा शिवसेनेत प्रवेश


राष्ट्रवादीच्या रंजना धानुकांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

मालाड - काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा पाठोपाठ मालाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. मालाड पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 44 च्या महिला उमेदवार रंजना सुभाष धानुका यांनी बंडखोरी करत रविवारी शिवेसेनेत जाहीर प्रवेश केला.

वॉर्ड क्रमांक 44 मध्ये रंजना धानुका या राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. राष्ट्रवादीने पहिल्या यादीतच धानुका यांना उमेदवारी जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे पक्षात वर्चस्वाची चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे आणि आमदार विद्या चव्हाण यांच्यात गेले कित्येक दिवस अंतर्गत वाद सुरू आहे. या वादाचाच फटका धानुका यांनी केलेल्या बंडखोरीतून समोर येत असल्याची चर्चा आहे. पण धानुका यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय.

अजित रावराणे आणि विद्या चव्हाण यांच्या वादाला कंटाळून नाही तर जनमताला पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला, असे स्पष्टीकरण धानुका यांनी दिले. तर धानुका यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिंकून येण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा