क्रिकेटसह सर्व खेळात आरक्षण असावे - रामदास आठवले

 Vidhan Bhavan
क्रिकेटसह सर्व खेळात आरक्षण असावे - रामदास आठवले

नरिमन पॉइंट - क्रिकेटसह इतर खेळांतही आरक्षण देण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. गुरुवारी आरपीआय (आठवले गट) मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

यासह त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो 500, 1 हजार किंवा 2 हजार रुपयांच्या नोटांवर असावा अशी मागणी केली. त्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री यांचीही भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील महापालिकेच्या निवडणुकीपासून शिवसेना-भाजपा -आरपीआय यांची युती आहे. मात्र कोणत्याही उद् घाटनाच्या वेळी आरपीआयला डावलले जाते. शिवसेना-भाजपा-आरपीआय यांची युती झाली तर आरपीआयला 25 ते 30 जागा पाहिजे. जर युती झाली नाही तर भाजपासोबत जाणार. अशा परिस्थितीमध्ये भाजपाने 60 ते 70 जागा आरपीआयला द्याव्यात. तसेच शिवसेना-भाजपा यांना एकत्र आणण्यासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न करणार आहे. असंही ते म्हणाले.

Loading Comments