'गुजरातसारखा मुंबईचा विकास होईल'

 Goregaon West
'गुजरातसारखा मुंबईचा विकास होईल'

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम येथील आय.बी.पटेल शाळेच्या मैदानात गुरुवारी राज्यमंत्री पुुरुषोत्तम रुपाला यांनी वॉर्ड क्रमांक 55 च्या उमेदवार हर्ष पटेल यांच्या प्रचार सभेला उपस्थिती दर्शवली. या वेळी महिला बाल कल्याण मंत्री विद्या ठाकूर, टी.व्ही कलाकार तन्मय पेकरिया (बागा) आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जशी गुजरातची प्रगती झाली तशीच प्रगती मुंबईची होईल असं काम भाजपाला करायचं आहे. म्हणून पालिकेत आपलाच महापौर आला पाहिजे. त्यासाठी बहुमताने भाजपालाच निवडून द्या असं आवाहन या वेळी रुपाला यांनी केलं.

Loading Comments