Advertisement

भाजपाकडून काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न - सचिन सावंत


भाजपाकडून काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न - सचिन सावंत
SHARES

नरिमन पॉईंट - मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. यात भाजपा सत्तेसाठी काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. नरिमन पॉईंट येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस समविचारी पक्षांची मदत घेणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या दोन्ही निवडणुका काँग्रेस लढवणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाला समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटलं. नोटाबंदीनंतरही मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा सापडत आहेत. हा फार मोठा घोटाळा असल्याचं सावंत म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकार तसंच आरबीआयच्या अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग आहे. त्याशिवाय इतका मोठा अपहार होऊच शकत नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा वापर भाजपाने फक्त निवडणुकीपुरताच केला असून तूर खरेदीला सरकारने मुदतवाढ दिली, मात्र अनेक केंद्रावर तूर मिळत नसल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा