संभाजी ब्रिगेडही निवडणुकीच्या रिंगणात

  Fort
  संभाजी ब्रिगेडही निवडणुकीच्या रिंगणात
  मुंबई  -  

  सीएसटी - सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या संभाजी ब्रिगेडनं राजकीय क्षेत्रातही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेड मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी येथे दिली.

  येथील मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'आज राजकीय सत्ता घराणेशाही, भांडवलदार आणि ब्राह्मणी शक्तींच्या ताब्यात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत, 18 महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवणार अाहोत. 170 जागांसाठी अर्ज आलेही आहेत. अमरावती, अहमदनगर, नाशिक, धुळे हे पदवीधर मतदारसंघ आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातूनही संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवेल. 60 ते 70 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात येईल,' असंही आखरे यांनी स्पष्ट केलं.
  काही कार्यकर्त्यानी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्याना अटक झाली. पण आम्ही 1 जानेवारी 2007 रोजी पुणे महापालिका आयुक्तांशी पुतळा हटवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. शिवसेनेच्या दादर येथे शिवसेना भवन आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तो काढून पुतळ्याच्या खाली लावावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे, असंही आखरे यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.