Advertisement

‘...तर अभियंत्यांना पुन्हा रस्त्यावर उभे करू’


‘...तर अभियंत्यांना पुन्हा रस्त्यावर उभे करू’
SHARES

मुंबई - रस्त्यांवरील खड्ड्यांवरून पालिकेतील मनसे गटनेते संदीप देशपांडे यांचा अाक्रमक पवित्रा कायम आहे. पालिका अभियंत्याला रस्त्यावर उभे केले म्हणून सदस्यत्व रद्द करण्याचा विचार आयुक्त करत आहेत. पण आम्हाला पदावरून काढण्याचा अधिकार केवळ जनतेला आहे, असा घणाघात करत देशपांडे यांनी दहा दिवसांत खड्डे बुजवले नाही, तर पुन्हा अभियंत्यांना रस्त्यावर अशाच प्रकारे उभे करू, असा इशारा गुरुवारी दिला.
वारंवार तक्रारी करूनही खड्डे न बुजवणाऱ्या अभियंत्याला 'मीच या खड्ड्यांना जबाबदार आहे,' अशी पाटी हातात देऊन देशपांडे आणि धुरी यांनी बुधवारी रस्त्यावर उभे केले होते. या आंदोलनानंतर पालिकेतील सर्वच अभियंते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर पालिका आयुक्तांनीही या दोन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करता येईल का याची कायदेशीर चाचपणी सुरू केली आहे.

मात्र संदीप देशपांडे यांनी या आंदोलनाचे जोरदार समर्थन केले आहे. "आम्ही घरी बसल्याने जर खड्डे बुजत असतील तर आम्ही स्वत: राजीनामे देऊ. पण जर का पुढच्या दहा दिवसांत खड्डे बुजवले नाही तर आयुक्त राजीनामा देतील काय?" असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

"या आंदोलनासाठी मला अटक झाल्यास जोपर्यंत खड्डे बुजत नाहीत, तोपर्यंत मी जामीन घेणार नाही. पाटी हातात दिल्याची लाज वाटल्याने राजीनामे देण्यापेक्षा काम केलं नाही याची लाज वाटून अभियंत्यांनी राजीनामे द्यावेत, असा टोला लगावत देशपांडे यांनी अभियंत्यांच्या आंदोलनावरही टीका केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा