सांगली जिल्हा विकास संघाचा वर्धापन दिन

 Chembur
सांगली जिल्हा विकास संघाचा वर्धापन दिन

चेंबूर - सांगली जिल्हा विकास संघाचा ४ था वर्धापन बुधवारी चेंबूरच्या सत्यभामा हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते झाला. सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना असून समाज बांधवानी एकत्र येऊन या समाजकार्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संभाजी लोखंडे यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमाला माजी खासदार एकनाथ गायकवाड़, माजी आमदार प्रकाश शेंडगे, काँग्रेस.द.म.मु.जिल्हा सचिव संतोष साठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी समाजिक कार्यात सहभाग असलेल्या अनेक मान्यवरांचा याठिकाणी सत्कार देखील करण्यात आला.

Loading Comments