Advertisement

संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राजकीय चर्चांना उधाण

महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रिंमडळात स्थान दिलं नाही.

संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राजकीय चर्चांना उधाण
SHARES

नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा (Maha Vikas Aghadi) मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra cabinet expansion) झाला. परंतु, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षात नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं.

महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रिंमडळात स्थान दिलं नाही. त्यामुळे सुनील राऊत आणि संजय राऊत नाराज आहेत, अशी चर्चा सुरू झाली. पण संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. पण बुधवारी त्यांनी टाकलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

नववर्षाच्या निमित्तानं त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. "हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो.. साथ, समय और समर्पण,” असं लिहिलेली ही पोस्ट नक्की संजय राऊतांनी कुणासाठी आणि कुणाला उद्देशून लिहिली आहे, याविषयी चर्चा सरू झाली आहे. याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


मंत्रिमंडळावरून सध्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी दुर करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 



हेही वाचा

...म्हणून शपथविधीला गेलो नाही - संजय राऊत

उद्धवा अजब तुझे सरकार- किरीट सोमय्या


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा