Advertisement

उद्धवा अजब तुझे सरकार- किरीट सोमय्या

कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमैय्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धवा अजब तुझे सरकार- किरीट सोमय्या
SHARES

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीमधील एकून ३६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसच्या १० आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून, अस्लम शेख यांनी देखील मंत्री आणि गोपनियतेची शपथ घेतली. अस्लम शेख यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच,, अस्लम शेख यांच्या शपथविधीवरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी 'उद्धवा अजब तुझे सरकार', अशा शब्दांत टीका करणारी एक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केली आहे.

अजब तुझे सरकार

'देशद्रोही आता देशभक्त झाले... उद्धवा, अजब तुझे सरकार' असं सोमय्यांनी म्हटलं आहे. 'सन २०१५ च्या अधिवेशनावेळी सध्याचे मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी याकूब मेमनच्या मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी ६ वेळा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं, अस्लम शेखला देशद्रोही असंही म्हटलं होतं. मात्र, आता तेच अस्लम शेख उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री बनले आहेत’, असंही सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

विधानसभेत मागणी

काँग्रेसचे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यातील आरोपी दहशतवादी याकूब मेमनला फाशी न देता माफी द्यावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यावेळी, शिवसेना आमदारांनी अस्लम शेख यांचा कडाडून विरोध केला होता. तसंच, त्यांनी देशद्रोही असंही म्हटलं होतं. मात्र, त्याच अस्लम शेख यांचा आता उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यावरुन भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका करत उद्धव यांना टार्गेट केलं.



हेही वाचा -

New Year: ३१ डिसेंबर निमित्ताने वाहतूक मार्गात बदल

IPL 2020 : मुंबईत रंगणार आयपीएलचा प्रथम सामना



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा