Advertisement

संजय राऊत यांनी 'शिवतीर्था'वर घेतली राज ठाकरेंची भेट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

संजय राऊत यांनी 'शिवतीर्था'वर घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र संजय राऊत यांच्या कन्येचं २९ नोव्हेंबर रोजी लग्न आहे. त्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्नीक राज यांच्या घरी आले होते.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच संजय राऊत हे त्यांच्या घरी गेले होते. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास मनमोकळ्या गप्पा झाल्या. मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देऊन संजय राऊत निघाले तेव्हा राज ठाकरे स्वत: त्यांना दरवाजापर्यंत सोडायला आले.

शर्मिला ठाकरे व राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे हे अलीकडेच 'कृष्णकुंज' येथून 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी राहायला आले आहेत. राऊत हे प्रथमच या नव्या घरी आले होते.

संजय राऊत आणि राज ठाकरे हे जुने मित्र आहेत. त्यांच्यात राजकारणाच्या पलीकडचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पक्ष वेगळे असतानाही त्यांनी हे संबंध जपले आहेत. आजच्या भेटीतून हेच दिसून आलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा