Advertisement

अर्णब गोस्वामींविरूद्ध दुसरा हक्कभंग?

हक्कभंगाच्या एकाही नोटिशीला उत्तर न देता ही गोपनीय नोटीस न्यायालयासमोर सादर केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामींवर दुसरा हंक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अर्णब गोस्वामींविरूद्ध दुसरा हक्कभंग?
SHARES

रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या हक्कभंगाच्या एकाही नोटिशीला उत्तर न देता ही गोपनीय नोटीस न्यायालयासमोर सादर केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामींवर दुसरा हंक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रिपब्लिक टीव्ही  वृत्तवाहिनीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये संपादक, वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि इतर मंत्र्यांबाबत हेतुपुरस्सर आक्षेपार्ह विधाने केल्याचं म्हणत शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामींविरोधात नियम २०३ अन्वये विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षासमोर मांडला होता. 

त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल ७ नोटीस अर्णब गोस्वामी यांना पाठवल्या. परंतु यापैकी एकाही नोटिसीचं उत्तर अर्णब गोस्वामी यांनी दिलं नाही.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

या हक्कभंग सूचनेसंदर्भात गुरुवारी विधानभवनात विशेषाधिकार समितीची बैठक झाली. त्यात विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षांसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली बाजू मांडली. त्यात अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळाने दिलेली नोटीस ही गोपनीय स्वरूपाची असताना त्यांनी ही नोटीस न्यायालयासमोर सादर केली. हा प्रकारसुद्धा हक्कभंग करणारा असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दुसरा हक्कभंग ठराव का मांडण्यात येऊ नये, असा प्रश्न प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी विशेषाधिकार समितीच्या बैठकीत उपस्थित केला. शनिवार ७ नोव्हेंबर रोजी विशेषाधिकार भंग व अवमान प्रकरणी विधानसभा विशेषाधिकार समितीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत अर्णब गोस्वामींविरोधात दुसरा हक्कभंग दाखल होणार की नाही हे कळेल.

(second breach of privilege might register against republic tv editor arnab goswami)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा