Advertisement

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामींविरोधात नियम २०३ अन्वये विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षासमोर मांडला.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
SHARES

रिपब्लिक टीव्ही  वृत्तवाहिनीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये संपादक, वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांबाबत हेतुपुरस्सर आक्षेपार्ह विधाने केल्याचं म्हणत शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामींविरोधात नियम २०३ अन्वये विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षासमोर मांडला. (shiv sena mla pratap sarnaik present breach of privilege resolution against republic tv journalist arnab goswami in maharashtra assembly monsoon session)

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडताच शिवसेनेचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. अर्णब गोस्वामी हे सुपारीबाज पत्रकार आहेत. वृत्तवाहिनीवर कार्यक्रम चालवताना ते न्यायाधीश असल्याच्या थाटात वागतात. स्वत:च खटला चालवतात आणि स्वत:च निकाल देतात, असा संताप शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त केला.

हेही वाचा - कंगना गोत्यात? विधानसभा अध्यक्षांनी दिले २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश

विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव मांडताना प्रताप सरनाईक म्हणाले, रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक आणि सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात २७३ अन्वये विशेषाधिकारभंग व अवमानाची सूचना देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका चित्रपट अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणावरून रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवर सातत्याने कपोलकल्पीत चर्चा घडवून आणण्यात येत असून या चर्चेमध्ये राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री आणि देशाचे नेते असलेले शरद पवार, मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, सभागृहातील विधानसभा-विधानपरिषद, लोकसभा-राज्यसभेचे सदस्य, यांच्याविरोधात वारंवार एकेरी शब्दाचा उल्लेख करून अर्णब गोस्वामी यांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे.

पूर्वी पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जायचं, परंतु आता केवळ टिआरपीची स्पर्धा सुरू आहे. अर्णब गोस्वामी यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर, दुष्टबुद्धीने, अत्यंत आक्षेपार्ह व अवमानकारक विधानं केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य आणि देशातील अनेक नेत्यांचा एकेरी शब्दाचा उल्लेख केला आहे. शिवाय एका अभिनेत्याच्या आत्महत्येशी कुठलाही संबंध नसताना तथ्यहीन, कपोलकल्पीत आरोप करून आपण स्वत: अत्यंत सज्जन, विद्वान व लोकशाहीचे रक्षक असल्याच्या अविर्भावात मुख्यमंत्री व इतर सभागृह सदस्यांची प्रतिमा जनमानसात मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यायाने सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे. त्यामुळे सादर केलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा