युतीसाठी 21 जानेवारीची डेडलाईन

 Mumbai
युतीसाठी 21 जानेवारीची डेडलाईन
युतीसाठी 21 जानेवारीची डेडलाईन
युतीसाठी 21 जानेवारीची डेडलाईन
युतीसाठी 21 जानेवारीची डेडलाईन
See all

मुंबई - भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील युतीच्या चर्चेसंबंधी पहिली बैठक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर झाली. दरम्यान युतीबाबत अंतिम निर्णय 21 जानेवारीपर्यंत घेण्यात यावा असं या बैठकीत ठरलं असल्याचं समजत आहे. बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत सांगितलं की, ‘पहिल्या फेरीत प्राथमिक चर्चा झाली. तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे काही मुद्यांवर चर्चा करतील. त्यानंतर, चर्चेची दुसरी फेरी उद्या दुपारी होण्याची शक्यता आहे.’ दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे, असं भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments