Advertisement

पालिकेत भेदभावाचे 'दिवे'


पालिकेत भेदभावाचे 'दिवे'
SHARES

मुंबई - मुंबईतील अनेक सागरी किनाऱ्यांवर सुशोभीकरण आणि रोषणाई करण्याबाबत पालिकेनं शिवसेनेला अंधारात ठेवलंय. भाजप नगरसेवकाच्या विभागातच केवळ दिवे लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पालिकेनं वर्सोव्याला डावळल्यानं स्थायी समिती अध्यक्ष चांगलेच संतापले.

महापालिकेच्या हद्दीतल्या मुंबईतील विविध सागरी किनाऱ्यांची शोभा वाढविण्यासाठी १०० दिवे लावण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. जुहू ते वर्सोवापर्यंतच्या चौपाट्यांवर दिवे बसवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणं अपक्षित होतं. पण प्रस्तावात वर्सोवाचा उल्लेख टाळण्यात आला. हा अर्धवट प्रस्ताव सादर करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी, असा आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिला.

संबंधित विषय
Advertisement