Advertisement

स्वबळासाठी सर्व्हे?


स्वबळासाठी सर्व्हे?
SHARES

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा होऊन 5 दिवस झाले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली भाजपा शिवसेना युती पालिका निवडणुकीत होणार की नाही याकडे राजकीय विश्लेषकांसह युतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबई पालिकेत सर्वात जास्त जागा असलेल्या शिवसेनेला यावेळी भाजपा कडवं आव्हान देणार. युतीविषयी दोन्ही पक्षात अनुकूल आणि प्रतिकूल असे मतप्रवाह आहेत. शिवसेनेने युती झाल्यास किती जागा मिळतील किंवा किती नुकसान होईल याचा सर्व्हे खासगी कंपनी कडून करून घेतला.
या सर्व्हेनुसार युतीत शिवसेनेचं नुकसान होईल असं दाखवण्यात आलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना स्वबळावर लढली तर 30 ते 40 जागा वाढण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलीय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सर्व्हे करण्यात आला होता.

 

 

 

 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा