शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद

 Pali Hill
शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद

माटुंगा - राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना (ईबीसी) लागू करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. हल्ली वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसून सगळं श्रेय लाटलं जातंय, असा टोला बुधवारी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. रुईया महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते. सहा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देणारा हा निर्णय सरकारचाच असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं.​

Loading Comments