Advertisement

मुंबई पालिकेत सेना-भाजप स्वतंत्र?


मुंबई पालिकेत सेना-भाजप स्वतंत्र?
SHARES

मुंबई - आगामी मुंबई पालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या

'भाजप इतर छोट्या मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वबळावर मुंबई पालिका निवडणुका लढवणार आणि जिंकणार आहे. मुंबई पालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच पक्षाने सत्ता ठेवत पालिकेला अड्डा बनवला आहे. भाजप पालिका निवडणुका जिंकून शिवसेनेचा माफियाराज संपुष्टात आणेल'

शिवसेनेकडून खरपूस समाचार

'शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाला कोणत्याही अशा लोकांच्या वक्तव्याची दखल घ्यायची किंवा त्यावर प्रतिक्रिया द्यायची गरज नाही', ज्यावेळी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याबद्दलची घोषणा करतील, तेव्हा ती भूमिका शिवसेना मानेल. आणि याविषयीची शिवसेनेची अधिकृत भूमिका दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर करतीलच".मुंबई लाइव्हवर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी हि प्रतिक्रीया दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement