महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे - सुभाष देसाई


SHARE

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यामुळे राज्य उद्योग विभागात पिछीडीवर असल्याचा काँग्रेसने केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. काँग्रेसने दिलेली आकडेवारी खोटी आणि हेतूपुरस्कर दिल्याचा आरोपही करत सुभाष देसाई यांनी यावेळी केला आहे.


इतर राज्याचे फक्त करार, महाराष्ट्राचे मात्र...

कर्नाटक राज्यात 1595 कोटीचे 15 प्रकल्प अंमलात आले. गुजरात राज्यात 6743 कोटींचे 42 प्रकल्प तर महाराष्ट्रामध्ये 9122 कोटी 50 प्रकल्प झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे सांगत देशाच्या अनेक राज्याचे फक्त करार झाले तरी महाराष्ट्राचे मात्र सामंजस्य करार झाले. आम्ही सामंजस्य कराराचे ठोस उपाययोजनेत रुपांतर व्हावे, यासाठी प्रयत्न केले. आम्ही प्रत्यक्ष गुंतवणुकीवर भर दिली आहे. विस्टोन नावाच्या कंपनीने 1300 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर दुचाकी वाहन निर्माण करणारी कंपनी 5 हजार कोटी रुपये राज्यात गुतंवणूक करणार असल्याची माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.


'यासाठी 15 हजार एकर जमीन संपादित करणार'

जपान, चीन, युरोप कंपनीने 3000 कोटी इंजीनिअर कंपनीसाठी देत आहे. ग्रीन रिफायनरीसाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. यासाठी 15 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक पहिल्यांदा होत आहेत. इंजिनिअरिंग उद्योगात 1700 कोटीची गुंतवणूक केली आहे. येत्या वर्षात राज्यात 54 हजार रोजगार निर्माण होणार आहे. तर 31 हजार कोटीचे 77 प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

फॉक्सकॉनच्या गुंतवणूकबाबत काहीच प्रगती नसल्याचे कारण सांगताना देसाई म्हणाले, "भारत आणि चिनच्या बिघडलेल्या संबंधामुळे फॉक्स कॉनच्या गुंतवणुकीला अडचण निर्माण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 44 उद्योग 30 हजार 401 कोटी गुंतवणूक 1 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचा दावाही देसाईंनी केला.

संबंधित विषय