Advertisement

शिवसेनेनं यूपीत करून दाखवलं! ४ उमेदवार विजयी


शिवसेनेनं यूपीत करून दाखवलं! ४ उमेदवार विजयी
SHARES

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेनं आता राज्याबाहेरही आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. अलाहाबाद महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या दीपेश यादव यांनी वॉर्ड क्रमांक ४० मधून निवडून येण्याचा मान पटकावल्याची माहिती युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


काय म्हणाले आदित्य?

‘शिवसेनेनं उत्तर प्रदेशात भगवा फडकवला आहे. करून दाखवलं. करून दाखवणार. ही तर एक सुरुवात आहे. काम करेंगे, दिल जितेंगे! सभी मतदाताओं को धन्यवाद’, असं ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी करत उत्तर प्रदेशातील सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.



राज्याबाहेरही झेप

मुंबई-ठाणे, महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची ओळख नाही, अशी ओरड नेहमीच होत होती. आता ‘करून दाखवलं’ हा नारा देणाऱ्या शिवसेनेने परराज्यातही आपली पाळंमुळं रोवण्यास सुरुवात केली आहे.


कोण आलं निवडून?

शिवसेनेचे उत्तर भारतीय नेते विनय शुक्ल यांनी शिवसेनेचे ४ नगरसेवक निवडून आल्याची माहिती आपल्या फेसबुक पेजवर दिली आहे. 



तर, वॉर्ड क्रमांक १६ उन्नाव येथून अशोक तिवारी, वॉर्ड क्रमांक ६ कासगंज येथून नेत्रपाल सिंह आणि वॉर्ड क्रमांक १४ सीतापूरमधून संगीता जोशी विजयी ठरले आहेत. दीपेश यादव यांचा विजय शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कारण उत्तर प्रदेशची धार्मिक आणि राजकीय नगरी असलेल्या इलाहाबादमधून एकेकाळी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही निवडणूक लढवली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा