मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा - शिवसेना

 Mumbai Airport
मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा - शिवसेना
Mumbai Airport  -  

मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यास जीव्हीके कंपनी दिरगांई करत असून याठिकाणी लवकरात लवकर पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी जीव्हीके कंपनीला लिहिले आहे.

मुंबई विमानतळाच्या विस्तारीकरणावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मूळ जागेवरून हटवून तो तात्पुरत्या स्वरुपात वेअर हाऊस, सहार रोड येथे ठेवण्यात आला होता.

विमानतळाचे काम आता पूर्ण झाले आहे. ज्या महापुरुषाच्या नावाने विमानतळ उभारण्यात आले आहे, असा शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व त्यांची माहिती विमानतळाच्या दर्शनी भागात असणे आवश्यक आहे. यामुळे परदेशातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व कळेल, असे परब यांनी पत्रात नमूद केले आहे.

Loading Comments