Advertisement

शिवसेनेच्या हाजी अराफत शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश


शिवसेनेच्या हाजी अराफत शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश
SHARES

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी नाट्यमयरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दोन दिवसांपूर्वी महामंडळ नियुक्त्यांमध्ये राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती भाजपकडून होती, अशी माहीती समोर आली आहे.


शिवसेनेला जय महाराष्ट्र

हाजी अराफत शेख हे शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून आयोगाच्या उपाध्यक्ष पदासाठी ते पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे लॉबिंग करत असल्याचं समजतं. मात्र शिवसेनेला त्यांनी जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे.


शिवसेनेला मोठा धक्का

उपनेते हाजी अराफात शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यावर अजूनतरी कोणत्याही शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्री आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने शिवसेनेवर धक्कातंत्राचं अवलंब करायला सुरुवात केल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा