गोरेगाव मध्ये शिवसेनेकडून पाणीवाटप


गोरेगाव मध्ये शिवसेनेकडून पाणीवाटप
SHARES

गोरेगाव - जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं सकाळपासून उन्हातान्हात बँकेच्या रांगेत उभे असल्याने गोरेगावच्या प्रत्येक शिवसेना शाखेने जवळील बँकेत जाऊन पाणीवाटप केले.

या बाबत शिवसेनेचे शाखाप्रमुख अजित भोगले यांनी सागितलं की नागरिक सकाळपासून रांगेत उभे होते, कुणीही येताना पण्याची बाटली आणली नव्हती. तसेच ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण या उद्देशाने जनतेची सेवा करतो, जेव्हापर्यंत लोकांची गर्दी बँकेत राहणार तेव्हापर्यंत रोज पाणीवाटप करणार असंही ते म्हणाले.

संबंधित विषय