जोगेश्वरी - गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीच्या इस्माइल युसुफ महाविद्यालयाला 30 डिसेंबर रोजी भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालयातल्या प्राध्यापक आणि प्राचार्यांसह बैठकही घेतली. तसंच महाविद्यालयाच्या अत्यावश्यक कामासंबंधी अनेक योजनाही आखल्या गेल्या.
बैठकी दरम्यान महाविद्यालयीन इमारतींची दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, कँटिन, पार्किंगची सोय, खेळाचे मैदान, जॉगिंग ट्रॅक, अॅथलँटिक ट्रॅक, लॉन टेनिस, स्विमिंग पूल, रंगमंच, सुरक्षाव्यवस्था, सोलर दिवे, अशा अनेक विषयांवर चर्चाही झाली. या वेळी विद्यार्थांच्या समस्या आणि अडचणी देखील वायकरांनी जाणून घेतल्या.