SHARE

वरळी - घरची परिस्थिती हलाखीची त्यातच कॅन्सरच्या विळख्यात सापडलेल्या शोभा आंबेकर यांना शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मदत करण्याचं ठरवलंय.

शोभा आंबेकर या वरळीतल्या बीडीडी चाळीत राहतात. मात्र घरची परिस्थिती आर्थिक दृष्टया सक्षम नसल्यामुळे त्यांच्या केमोथेरपीच्या उपचाराला लागणारा खर्च शिवसेनेनं केला. आर्थिक मदत म्हणून आंबेकर यांच्याकडे चेक सुपुर्द करण्यात आला. "आमदारांच्या आर्थिक मदतीमुळे आईला जीवदान मिळेल, ती लवकर बरी होईल ही अपेक्षा आहे," असं त्यांची मुलगी सुमेधा आंबेकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या