शिवसेनेतील (Shiv Sena) सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.
मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत, महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.