Advertisement

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेचं गुजराती मतदारांकडे लक्ष

मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेनं आता कंबर कसली आहे. यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नेतेमंडळी कामाला लागली आहे.

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेचं गुजराती मतदारांकडे लक्ष
SHARES

मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेनं आता कंबर कसली आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नेतेमंडळी कामाला लागली आहे. असं असतानाच मुंबईत फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचं शिवसेनेनं ठरवलं आहे. त्यानुसार, आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजराती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत.

येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल १०० गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भाजपच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपनं कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचं भाजपनं जाहीर केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा