गोरेगावमध्ये शिवसेनेचा रोजगार मेळावा

 Goregaon
गोरेगावमध्ये शिवसेनेचा रोजगार मेळावा
गोरेगावमध्ये शिवसेनेचा रोजगार मेळावा
गोरेगावमध्ये शिवसेनेचा रोजगार मेळावा
गोरेगावमध्ये शिवसेनेचा रोजगार मेळावा
गोरेगावमध्ये शिवसेनेचा रोजगार मेळावा
See all

गोरेगाव - तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 29 डिसेंबरला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गोरेगावच्या सरदार पटेल सभागृहात आयोजित या मेळाव्यात हजारो तरुण-तरुणींनी भाग घेतला होता. तर यामध्ये 47 नांमाकित कपंन्यानी सहभाग घेतला होता. यावेळी कोटक महिंद्रा, गोद्ररेज, डीएनए अॅक्सिस बँक, एअरपोर्ट, एअरटेल अशा विविध नामांकित कपंन्यानी आपल्या कपंनीची माहिती दिली आणि तिथे आलेल्या युवकांना प्रस्ताव पत्र दिले.

या वेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात भाग घेतलेल्या प्राची देसाईने ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलं की, 'एक वर्षापासून नोकरी शोधत आहे, पण या मेळाव्यात पाच कंपन्यांनी मुलाखत घेतली. त्यातल्या दोन कंपन्यांनी पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे'.

Loading Comments