Advertisement

तेव्हा 'त्यांची' आपुलकी कुठं होती? उद्धव ठाकरे

बाळासाहेब समजायला 'त्यांना' ५० वर्षे लागलीत. काहींना तर अजूनही ते समजलेले नाहीत. तुमच्याही काळात मुंबई तोडायचा कट होता. मात्र शिवसेना तेव्हाही खंबीर होती आणि आजही खंबीर असल्याचं म्हणत उद्धव यांनी पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या तोफ डागली.

तेव्हा 'त्यांची' आपुलकी कुठं होती? उद्धव ठाकरे
SHARES

मुंबईत १९९३ साली झालेल्या दंगलीला जबाबदार धरत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना २००० साली अटक करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कुणीही त्यांना आपुलकी दाखवली नाही. उलट ते तुरुंगात कसे जातील, अशीच 'त्यांची' भूमिका होती, असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.

बाळासाहेब समजायला 'त्यांना' ५० वर्षे लागलीत. काहींना तर अजूनही ते समजलेले नाहीत. तुमच्याही काळात मुंबई तोडायचा कट होता. मात्र शिवसेना तेव्हाही खंबीर होती आणि आजही खंबीर असल्याचं म्हणत उद्धव यांनी पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या तोफ डागली.


मंडल आयोगाचं भूत

'ती मुलाखत मी चोरूनही पाहिली नाही' असं सांगत शिवसेना प्रमुखांचा निर्णय कधीच चुकलेला नाही हे कालच्या मुलाखतीतून समोर आल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

त्यावेळी पवार साहेबांनी मंडल आयोगाचं भूत निर्माण केलं. ज्या ज्या भूमिका शिवसेनाप्रमुखांनी मांडल्या त्या तेव्हाच जर ऐकल्या असत्या तर जातीपातीवरून जी परिस्थिती उद्भवली ती उद्भवली नसती, असं सांगत उद्धव ठाकरेंनी पवारांना टोला लगावला.


पाठीत खंजीर खुपसला नाही

आरक्षण आर्थिक निकषावर असायला हवं, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची सुरुवातीपासूनच होती. मात्र तेव्हा काहींना ते पटत नव्हतं. ५० वर्षे शिवसेना प्रमुख याच विषयावर बोलत होते. पण तेव्हा कुणी त्यांना पाठिंबा दिला नव्हता. टीका करायची तेव्हा टीका करायची हा बाळासाहेबांचा स्वभाव. पण त्यांनी मागून पाठीत खंजीर नाही खुपसला, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.



हेही वाचा-

कुणी वरून जरी आलं, तरी मुंबई महाराष्ट्रवेगळी करू शकत नाही- पवार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा