नव्या वर्षात महाराजांच्या स्मारकाचे काम होणार सुरू


  • नव्या वर्षात महाराजांच्या स्मारकाचे काम होणार सुरू
  • नव्या वर्षात महाराजांच्या स्मारकाचे काम होणार सुरू
SHARE

कफ परेड - येत्या नवीन वर्षात अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवीजी महाराजांच्या भव्य दिव्य स्मारकाचं काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कफ परेड येथील शिव स्मारक कार्यालयात शनिवारी स्मारकाच्या कामकाजाविषयी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. स्मारक बांधण्यासाठी निविदा मंजुरीचे काम सुरू असून लवकरच स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल असंही ते म्हणाले.

2017 च्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल असं शिव स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या