• अखेर युतीचा पोपट मेला
SHARE

गोरेगाव - प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना गिफ्ट दिलंय. गोरेगावच्या एनएसई ग्राउंडवर आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ही घोषणा करण्याआधी मला निखाऱ्यावर चालणारे आणि लढणारे शिवसैनिक पाहिजे असल्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे 26 जानेवारीला युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्या 50 वर्षांच्या कालावधीतील युतीमुळे शिवसेनेची 25 वर्ष सडली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. सरकारमध्ये नालायक लोकं बसली आहेत. वज्रमूठ द्या, दात मी पाडतो असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. जरी भाजपा-शिवसेनेची युती तुटली असली तरी शिवसैनिकांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या