शिवसेना पक्षप्रमुखांनी मुंबईकरांचे मानले आभार

 CST
शिवसेना पक्षप्रमुखांनी मुंबईकरांचे मानले आभार

सीएसटी - मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत सहकुटुंब जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या बाहेर छोटेखानी विजयी सभा देखील घेतली. यात त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले.

यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना घेऊन उद्धव ठाकरे कुटुंबासह मुंबई महापालिका ते हुतात्मा चौकापर्यंत पायी चालत गेले. हुतात्मा चौकात सर्वांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.


Loading Comments