Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

'एनडीए'तून बाहेर काढणारे तुम्ही कोण? इतिहासाचे दाखले देत, सामनातून भाजपवर टिका

‘शिवसेना हा एनडीए या आघाडीचा संस्थापक सदस्य असून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडीस, पंजाबचे बादल आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीएची वीट रचल्याची आठवण शिवसेनेने’ करून दिली.

'एनडीए'तून बाहेर काढणारे तुम्ही कोण? इतिहासाचे दाखले देत, सामनातून भाजपवर टिका
SHARE

बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा करण्यात आली. हा घाव शिवसेनेच्या चांगलाच वर्मी बसला असल्याची प्रतिची शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या सामानाच्या अग्रलेखातून दिसून आले आहे. “कोणत्याही बैठकी शिवाय आणि साधक बाधक चर्चेशिवाय शिवसेनेला 'एनडीए'तून बाहेर काढण्यात आले असून, शिवसेना हे कदापी सहन करणार नसल्याचे सामनात म्हटले आहे.”

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरू झालेल्या वादाचे पडसाद आता केंद्रात ही दिसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या तटस्थच्या भूमिकेमुळे केंद्रात अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर शिवसेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र शिवसेना एनडीएतून अधिकृत बाहेर पडली का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच,  भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी १७ नोव्हेंबरला, शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच शिवसेना महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह युती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या बाजूला जागा देण्यात येत आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे एनडीएतून शिवसेनेची हकालपट्टी केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होती.

या चर्चांना शिवसेनेने त्यावेळी कोणतेही उत्तर न देता शांत बसणेच पत्करले. मात्र सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी सरकारला अभुतपूर्व विरोध दर्शवला. यामुळे शिवसेना आणि 'एनडीए'मध्ये बिनसल्याचे आता जगजाहीर झाले होते. त्यातच मंगळवारी ‘सामना’तून मात्र शिवसेनेने एनडीएतून परस्पर शिवसेनेला वगळण्याबाबत राग व्यक्त केला गेला आहे.  सामानाच्या अग्रलेखातून ‘शिवसेना हा एनडीए या आघाडीचा संस्थापक सदस्य असून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडीस, पंजाबचे बादल आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीएची वीट रचल्याची आठवण शिवसेनेने’ करून दिली.

एनडीएच्या कोणत्याही निर्णयाअगोदर बैठक आणि चर्चा हा शिरस्ता होता, मात्र तो आता पाळला जात नसून शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढल्याची केलेली घोषणा ही परस्पर केल्याचे सामनातून म्हटले आहे. शिनसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची घोषणा म्हणजे मनमानी कारभार आणि अहंकारी रा़जकारणाच्या अंताची सुरूवात असल्याचे सामनात म्हटले आहे. जेव्हा देशात भाजपच्या विचारांमुळे कोणीही भाजपच्या जवळ जाऊ इच्छित नव्हते, तेव्हा भाजपला जवळ करण्याचे काम शिवसेनेने केले होते. राज्यात युती आणि केंद्रात एनडीएची मुहुर्तमेढ त्यामुळेच रोवता आली होती. मात्र, आज शिवसेनेला न विचारता घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम एनडीएला भोगावे लागतील असे सामनात म्हटले आहे. तसेच इतिहासातील दाखले देत, शिवसेनेला सतत धोका देण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीही शिवसेनेने सर्व सहन केले आहे, मात्र यापुढे तसे होणार नसल्याचा इशारा यावेळी सामनातून देण्यात आला आहे.

संबंधित विषय
संबंधित बातम्या