Advertisement

कोस्टल रोडच्या भूमीपूजनात मुख्यमंत्र्यांना डावललं

उद्धव म्हणाले की, काम अाणि वचनपूर्तीतून समाधान वाटत असून ३० ते ३५ वर्ष शिवसेनेला अमाप मिळाले अाहे. या ऋणात मी राहू इच्छित असून कोस्टल रोड हे माझं नाही तर मुंबईचं स्वप्न अाहे.

कोस्टल रोडच्या भूमीपूजनात मुख्यमंत्र्यांना डावललं
SHARES

मुंबई महापालिकेच्या बहुचर्चीत कोस्टल रोडचे भूमीपूजन रविवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात अाले. कोस्टल रोडच्या भूमीपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने निमंत्रण दिले नव्हते. भूमीपूजनासाठी मुख्यमंत्र्यांना डावलल्याने भाजपामध्ये तीव्र नाराजी अाहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता अाहे.  कल्याण येथील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात अाले. या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात अाले नव्हते. याचाच वचपा अाता शिवसेनेने काढल्याचे बोलले जात अाहे. 


मुंबईचं स्वप्न 

भूमिपूजनाचा कार्यक्रम मुंबई महापालिकेचा असल्याने कदाचित मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नसावे. हे तपासून पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली अाहे. यावेळी उद्धव म्हणाले की, काम अाणि वचनपूर्तीतून समाधान वाटत असून ३० ते ३५ वर्ष शिवसेनेला अमाप मिळाले अाहे. या ऋणात मी राहू इच्छित असून कोस्टल रोड हे माझं नाही तर मुंबईचं स्वप्न अाहे. 


केंद्र, राज्याचे अाभार

कोस्टल रोड टोल फ्री असेल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव यांनी यावेळी मुंबईकरांच्या विकासकामात अाडवे न अाल्याबद्दल केंद्र सरकार अाणि राज्य सरकारचे अाभारही मानले. कोळी बांधवांचा या प्रकल्पाला असलेला विरोध लक्षात घेत, कोणाला भकास करून विकास करायचा नाही, कोळी बांधवांनी काळजी करू नये, त्यांच्या कोणत्याही गोष्टीला हात लागणार नाही, असं अाश्वासन उद्धव यांनी दिलं. 


कंत्राटदारांना तंबी

कोस्टल रोडचं भुलाभाई देसाई राेड, अमरसन्स उद्यान येथून काम सुरू होणार अाहे. हे काम चार वर्षात पूर्ण होणार अाहे. कंत्राटदारांनी कामात विलंब केल्यास वाढीव खर्च पालिका देणार नाही, अशी तंबीच यावेळी उद्धव यांनी दिली. तर काेस्टल राेडसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. तशी नोटीस  सर्व देशांमधील दूतावासात लावण्यात आली हाेती. त्यामुळे तिथे जाणाऱ्यांना महापालिकेचा पारदर्शक कारभार दिसला असेल, असा टाेला उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना लगावला अाहे. हेही वाचा - 

कोस्टल रोडवरून राज ठाकरे आक्रमक; वरळीतील कोळी बांधवांची घेतली भेट
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा