जोगेश्वरी - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखांमध्ये बैठकांना वेग आला आहे. रामनगर येथील शिवसेना शाखा क्र. 48 मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विभागातील सेना पदाधिकारी, गटप्रमुख आणि युवासैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिवसेनेतर्फे विभागात होणाऱ्या कामकाजाचा आढावा, वार्षिक अहवाल या बैठकीत करण्यात आला.