Advertisement

उद्धव ठाकरेंचं सरकारला जशास तसं उत्तर


उद्धव ठाकरेंचं सरकारला जशास तसं उत्तर
SHARES

शिवसेना भाजपमधील सूत काही केल्या जुळताना दिसत नाही. शिवसेनेशी जुळवून घेण्यासाठी भाजप सरकारचं मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचं निमित्तही अयशस्वी ठरलं आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या मुख्य कार्यक्रमाला सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, नुकतेच पार पडलेल्या महाउद्योगरत्न या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना विशेष पाहुणे म्हणून राज्य सरकारकडून निमंत्रित करण्यात आलं होतं. पण तरीही त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याने सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.


म्हणून कार्यक्रमाला अनुपस्थिती

महाउद्योगरत्न सन्मान रजनी या कार्यक्रमाचं आयोजन राज्य सरकारनं केलं. त्याविषयीच्या जाहिरातीही सर्व वर्तमानपत्रात दिल्या. याचसोबत या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं असतानाही उद्धव ठाकरे कार्यक्रमाला पोहोचलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीतच कार्यक्रमाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रित न केल्यानं उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

मॅग्नेटिकमध्ये नाणार रिफायनरीचा स्टॉल

शेतकऱ्यांचा विरुद्ध असेल तर नाणार रिफायनरी होणार नाही, असं आश्वासन एकीकडे मुख्यमंत्र्यानी उद्धव ठाकरे आणि शिष्टमंडळाला दिलेलं असताना दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये नाणारचा मोठा स्टॉल उभा करण्यात आला आहे. तिथे हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणार असून याबाबतची प्रत्येक माहिती देण्यात अाली अाहे. त्यामुळे सरकारचा मनसुबा ठरलेला असताना सेनेला खोटी आश्वासनं दिली जात आहेत का? असे अनेक प्रश्न अाता उपस्थित होऊ लागले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा