Advertisement

'हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है'- स्मृती इराणी

सोशल मीडियातून इराणी यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली. या टीकेनंतर इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतील फोटो टाकत आणि ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असं लिहित, टिकाकारांना उत्तर दिलं आहे.

'हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है'- स्मृती इराणी
SHARES

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाच्या मुद्द्यावर बोलताना केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? मग अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना कशी काय करू शकता? असा वादग्रस्त सवाल केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियातून इराणी यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली. या टीकेनंतर इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतील फोटो टाकत आणि ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असं लिहित, टिकाकारांना उत्तर दिलं आहे.


काय म्हटल्या होत्या इराणी?

- महिलांना मासिक पाळी येणं ही अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकता का? मग देवाच्या मंदिरात तुम्ही त्या अवस्थेत कसं काय जाल?

- मंदिरात जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु मासिक पाळी आल्यावर तशाच अवस्थेत तुम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना कशी काय करू शकाल? त्यासाठी हट्ट करण्याचं कारण काय?

- अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री म्हणून त्यावर मत नोंदवू शकत नाही.

View this post on Instagram

#hum bolega to bologe ki bolta hai... 😂🤔🤦‍♀️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on


चौफेर टीका

या वक्तव्यानंतर विरोधक आणि सर्वसामान्यांनी इराणी यांच्यावर सडकून टीका केली होती. महिला असूनही एक केंद्रीय मंत्री महिलांच्याच बाबतीत असं वक्तव्य करते, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचं म्हणत सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका करण्यात आली.


काय आहे फोटोत?

त्यानंतर इराणी यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील एक फोटो एडिट करुन तो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या फोटोत तोंड बांधलेल्या सासूच्या जागी त्यांनी स्वत:ला दाखवलं आहे. या पोस्टवर त्यांनी ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असंही लिहिलं आहे. त्यांनी टाकलेल्या या पोस्टला १० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर काही जणांनी त्यांच्या या पोस्टवर कडाडून टीकाही केली आहे.



हेही वाचा-

रक्ताने माखलेलं सॅनिटरी पॅड मित्राच्या घरी न्याल का? स्मृती इराणी यांचं वादग्रस्त वक्तव्य


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा