'सपा'च्या पहिल्या यादीत 23 उमेदवार

 CST
'सपा'च्या पहिल्या यादीत 23 उमेदवार

नरिमन पॉइंट - उत्तर प्रदेशातली 'यादवी' संपलेली नसतानाच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 23 उमेदवारांची पहिली यादी समाजवादी पार्टीने सोमवारी जाहीर केली. या 23 जणांत दोन विद्यमान नगरसेवकही असल्याची माहिती सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आझमी म्हणाले की, मुलायम सिंग यादव माझ्यासाठी आदरणीय नेताजी आहेत. 22 वर्षांपासून मी पक्षात कार्यरत आहे. मुलायम सिंग यांनी निवडणुकीच्या काळापुरतं अखिलेश यादव यांना माफ करावं. उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार येऊ देऊ नका, अशी विनंती मी मुलायम सिंग यांना माध्यमांमार्फत करतो आहे.
मुस्लीम मताचं विभाजन नको, अशी भूमिकाही आझमी यांनी पहिली यादी जाहीर करताना मांडली. भिवंडी येथील एमआयएमचे अध्यक्ष जुबेर शेख शहा यांनी 'सपा'मध्ये प्रवेश केला असल्याची माहितीही आझमी यांनी दिली.

Loading Comments