गोरेगाव - आदिवासी जनतेला कपडे आणि अन्नधान्य वाटप करणाऱ्या मुंबई डबेवाला संघटना आणि गणेश हिरवे ग्रुपला शिवसेनेच्या शाखा ४८च्या विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या वेळी शिवसेना शाखा क्रमांक ४८ चे प्रमुख अजित भोगले यांनी रहिवाशांनी दिलेल्या वस्तू डबेवाल्यांकडे सुपूर्द केल्या.