शिवसेना खासदार काढणार धडक मोर्चा

 BMC
शिवसेना खासदार काढणार धडक मोर्चा

फोर्ट - शिवसेनेचे सर्व खासदार आणि शिवसेना कार्यकर्ते मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर धडक देणार आहेत. सोमवारी 11 वाजता फोर्ट येथील अमर बिल्डिंगमध्ये असलेल्या मुख्यालयावर ते धडक मोर्चा काढणार आहेत. नोटबंदी आणि त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी परवड या विरूद्ध निदर्शनं करणार आहेत. त्यानंतर 12 वाजता राज्यपालांना भेटून निवेदनही देणार आहेत.

Loading Comments