काय म्हणतोय राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प?

 Nariman Point
काय म्हणतोय राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प?

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा 2017-18 हा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी सुरू केलेला गदारोळ शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्या गदारोळातच सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चिमटे काढत, शेरो-शायरी, कविता करत बजेट सादर केला. 62 हजार 844 कोटी रुपयांचा मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.


राज्याचा अर्थसंकल्प 2017

अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय? -

• मुंबई मेट्रो प्रकल्प लवकर पूर्ण करणार - मुनगंटीवार
• मेट्रोच्या कामासाठी 700 कोटींची तरतूद
• मुंबईच्या चित्रनगरीत 'महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा' सुरू करणार
• 253 आरोग्य केंद्रांवर कॅन्सर निदान आणि उपचार
• महापुरुषांच्या स्मारकांसाठी 200 कोटी
• इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 200 कोटींची तरतूद
• जीएसटी पद्धतीमुळे देशात एकसंघ बाजारपेठ
• मुंबईतल्या जकातीसाठी तरतूद
• व्हॅटच्या अंमलबजावणीनंतर मुंबईतील जकात जाणार
• नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये सीसीटीव्ही बसवणार
• मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाला 25 कोटी देणार
• बंदर जोडणी प्रकल्पासाठी 70 कोटी
• मिल्क टेस्टींग किटवरचा कर काढला
• मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा, नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेट्रो हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील
• स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या शहरांच्या विकासासाठी 1 हजार 600 कोटी रु. निधीची तरतूद

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 'महाइन्फ्रा' नावाची हेतूवहन संस्था स्थापन केली जाणार

शहरांमध्ये उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 211 कोटी रुपयांची तरतूद

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पूर्णपणे संगणकीकरण

निवडक 31 रुग्णालयात सिटी स्कॅन बसिवण्यात येणार

गॅस आणि विद्युत दाहिनीवरील कराचा दर 13.5% वरून 0 % करण्यात आला आहे

कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्ड स्वाईप मशीनवरील कर 13.5 % वरून 0% करण्यात आले

गोराई, भाईंदर, वसई, घोडबंदर आणि इतर चार ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी राज्य सरकारची 50% निधी देण्याची तरतूद


काय महागलं?
देशी विदेशी दारु महागली, कर वाढले
ऑनलाईन, पेपर लॉटरी महागली, कर वाढवला

काय स्वस्त?

कॅशलेस व्यवहारासाठी स्वॅपिंग मशीन स्वस्त होणार

जीएसटी लागू होईपर्यंत काय स्वस्त?
तांदूळ, गहू, डाळी, हळद, मिर्ची, चिंच, गूळ, नारळ, धणे, मेथी, पापड, ओला खजूर सोलापूरी चादर, आमसूल, बेदाणे, मनुका यावरील मुल्यवर्धित कर जीएसटीपर्यंत माफ

अर्थसंकल्पात राज्यासाठी काय तरतूदी? 
• राज्याचा विकासदर वाढवण्याचा प्रयत्न
• उद्योग क्षेत्रात वाढ करण्याचा उद्देश
• डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटी 64 लक्ष रु. निधीची तरतूद
• गेल्या दोन वर्षांत जलसंपदा विभागासाठी ८,२३३ कोटींची तरतूद, पूर्ण निधीचे वाटप


शेतीसाठी 

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आठवडी बाजार योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी 50 कोटी रु. ची तरतूद

सन 2021 पर्यत उर्वरित सर्व शेतकऱ्यांना मृदा, आरोग्य पत्रिकांची वाटप करणार

थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना करताना नियमित कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना

2021 पर्यंत शेतीचे उत्पन्न दुप्पट करणार, सिंचन प्रकल्पासाठी २ हजार ८१२ कोटी

कृष्णा- मराठवाडाप्रकल्प पहिला टप्पा ४ वर्षात पूर्ण करणार

१ हजार २०० कोटी जलयुक्तशिवारासाठी, जलसंपदा निधी १०० टक्के वापरणार

शेतकऱ्यांसाठी २०० कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी 100 कोटींची तरतूद, कृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची तरतूद, अॅग्रो मार्केटसाठी 50 कोटींची तरतूद

मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करणार

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचे उद्दीष्ट, जलयुक्त शिवारासाठी आतापर्यंत 1600 कोटी दिले, पुढील वर्षासाठी 1200 कोटींची तरतूद


सुरक्षा 
पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडसाठी एकच नंबर – ‘डायल 112’

पोलीस गृहनिर्माणासाठी 325 कोटींचा निधी

रस्ते अपघात रोखण्यासाठी ३४ कोटी ८६ लाख निधी

नवी मुंबई, मिरा-भाईंदर, अमरावती, चंद्रपूरमध्ये सीसीटीव्ही बसवणार


शिक्षण 
मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या शतकपूर्तीनिमित्त मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था असे नामकरण करून विभागाची पुनर्रचना करणार, यासाठी पुढील 5 वर्षात 25 कोटी रु. निधी उपलब्ध करणार

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान रुसा या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 40 कोटी रु. निधीची तरतूद

औरंगाबाद येथे स्थापन होणा-या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी 39 कोटी 28 लक्ष रु. निधीची तरतूद
चंद्रपूर येथे सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी 200 कोटी रु. निधीची तरतूद

नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामाच्या धर्तीवर मुंबईच्या गोरेगावमध्ये महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा उभारणार
मराठी भाषा संवर्धनासाठी १७ कोटींची तरतूद

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास या अभियानासाठी 99 कोटी4+ रु. निधीची तरतूद, 1 हजार 970 प्रशिक्षण संस्था सुचीबध्द, यामध्ये 57 टक्के महिलांचा समावेश

35 उद्योग समूहांबरोबर सामजंस्य करार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणार
ग्रामीण भागातील गवंडी कारागिरांना प्रशिक्षित करणार, 10 हजार गवंडी कामगारांना मिळणार रोजगाराची संधीपायाभूत सुविधा, रस्ते

रस्ते बांधकाम व सुधारणा कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास 7 हजार कोटी रु. निधीची तरतूद

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 1630 कोटी, तर 50 कोटी प्रलंबित रेल्वे मार्गांसाठी
रस्ते सुधारण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद

दहा हजार किलोमीटरचे रस्ते येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य

केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत 2 हजार 211 कि.मी. रस्त्यांची लांबी सुधारण्यात येत असून 252 मोठया पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार

प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापन करण्यासाठी 50 कोटी रु. निधी उपलब्ध करणार

मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरु बंदर न्याय यांच्या समवेत संयुक्त उपक्रम करारनामा, वाढवण त. डहाणू येथे सॅटेलाईट टर्मिनल उभारणार

राज्य सरकारच्या समभाग गुंतवणूकीतून कॉर्पोरेट मेजर पोर्ट उभारण्याचा देशातील पहिलाच प्रकल्प

बंदर क्षेत्राच्या विकासासाठी 70 कोटी रु. निधीची तरतूद

सागरमाला कार्यक्रमातंर्गत आठ जेट्टीच्या बांधकामाकरीता 71 कोटी 78 लक्ष इतक्या अंदाजित किंमतीपैकी 50 टक्के निधीची राज्य सरकारतर्फे तरतूद


Loading Comments