Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

निसर्ग चक्रीवादळ: प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचं आवाहन

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता असल्याने राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी किनारपट्टी भागातील सर्व रहिवाशांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळ: प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचं आवाहन
SHARES

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता असल्याने राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी किनारपट्टी भागातील सर्व रहिवाशांना काळजी (state environment minister aaditya thackeray request all citizens to follow the instructions of all the local authorities strictly for the cyclone nisarga) घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाच्या परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचना केल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. या संकटाचा पूर्ण तयारीनिशी सामना करु असंही ते म्हणाले.

वादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत पालिकेच्या तयारीचा आढावा घेतला.  

यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले की, निसर्ग चिक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं. अशा स्थितीत काय करावं आणि काय करू नये याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाच्या परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचना केल्या आहेत.

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळाचा धोका, बीकेसीतल्या कोरोना रुग्णांना 'या' स्थळी हलवलं

निसर्ग चक्रीवादळ बुधवार ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आलं असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ज्या व्यक्ती कच्च्या घरात राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकरद्वारे सांगण्यात आलं आहे. यासाठी पक्की निवारागृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आलं असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसंच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा