Advertisement

प्ले स्टोअरवरून 'महामित्र अ‍ॅप' गायब


प्ले स्टोअरवरून 'महामित्र अ‍ॅप' गायब
SHARES

'नमो अ‍ॅप’वरून केंद्रीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच राज्यातही सत्ताधारी पक्षाशी संबंधित 'महामित्र अ‍ॅप' वादात सापडले आहे. या अॅपवरची माहिती खासगी संस्थांकडे जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांतच आता महामित्र अ‍ॅप प्ले डोअर आणि गुगल प्ले स्टोअर वरून अचानक काढून टाकण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे.


शासनाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह

या शासकीय मोबाईल अ‍ॅपवरील वापरकर्त्यांचा डेटा संमतीशिवाय खासगी संस्थेला हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र आता खुद्द शासनानेच ते पाठी घेतल्याने खरंच शासनाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


'अनुलोम'वर पृथ्वीराज चव्हाणांचे आक्षेप

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जमा केलेली माहिती 'अनुलोम' या रा. स्व. संघाशी संबंधित संस्थेला कशी काय दिली जाते? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला होता. माहिती हस्तांतरित करण्याकरिता आदान-प्रदानाचा करार राज्य शासन आणि या संस्थेमध्ये झाला आहे का? वापरकर्त्यांची संमती शासनाने घेतली आहे का? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले होते.


अॅप सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा

चव्हाण यांच्या प्रश्नांवर महामित्रमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची खातरजमा होण्यासाठी तसेच उपक्रमातील पुढील कार्यवाहीबाबत तपशील देण्यासाठी केवळ मोबाइल क्रमांक आणि ई-मेल पत्ता नोंदविण्यास सांगण्यात आले होते. तसेच, ही सर्व माहिती अ‍ॅपवर सुरक्षित असल्याचं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता अचानक प्रशासनाने हे अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

महामित्र अ‍ॅप प्ले स्टोअरवरून काढल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

महामित्र अ‍ॅप असं तडकाफडकी आणि पूर्वसूचना न देता प्ले स्टोअरवरून काढण्याचं नेमकं कारण काय? हे सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. जर हे अ‍ॅप सुरक्षित आणि माहितीचा गैरवापर करणारे नव्हते, तर त्याबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतरच सरकारने एवढ्या घाईत याबद्दल पावले का उचलली? याचं स्पष्टीकरण द्यावे.

पृथ्वीराज चव्हाण, नेते , काँग्रेस



हेही वाचा

'नमो'प्रमाणेच 'महामित्र'मधूनही माहितीची चोरी - पृथ्वीराज चव्हाण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा