Advertisement

भरमसाठ बील आकारणाऱ्या रूग्णालयांवर वचक बसणार! राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट!


भरमसाठ बील आकारणाऱ्या रूग्णालयांवर वचक बसणार! राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट!
SHARES

राज्यातील खाजगी रुग्णालये रूग्णांकडून भरमसाठ बील आकारतात. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट' हा कायदा आणला. त्याप्रमाणे राज्यातही हा कायदा लवकरच आणला जाईल. यासंदर्भात अनेक संघटनांशी चर्चा करण्यात आली असून, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी दिली.


लक्षवेधी सूचनेच्या वेळी मुद्दा उपस्थित 

नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये ठेवलेलं रक्त वाया जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारत रुग्णालयांच्या भरमसाठ बील आकारणीचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.


'त्या' रुग्णालयांवर कारवाई

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, भाजपा नेते एकनाथ खडसे, माजी आमदार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही भरमसाठ बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर काय कारवाई करणार? असा उपप्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना भरमसाठ बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचं आश्वासन दीपक सावंत यांनी दिलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा