Advertisement

परप्रांतीयांच्या शोधासाठी भरारी पथकं नेमा, शरद पवारांची सूचना

राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांचा शोध त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी भरारी पथकं नेमावीत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी राज्य सरकारला केली आहे.

परप्रांतीयांच्या शोधासाठी भरारी पथकं नेमा, शरद पवारांची सूचना
SHARES

औरंगाबाद इथं रेल्वे दुर्घटनेत (aurangabad railway accident) झालेल्या १६ परप्रांतीयांच्या मृत्यूची दखल घेऊन राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांचा शोध त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी भरारी पथकं नेमावीत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी राज्य सरकारला केली आहे. 

मनाला यातना

परप्रांतीयांच्या प्रश्नासंदर्भात मार्गदर्शन करताना शरद पवार सरकारला उद्देशून म्हणाले की, औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या (migrant workers) दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही, तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

हेही वाचा - IFSC मुंबईतच ठेवा, नाहीतर देशाचं आर्थिक नुकसान- शरद पवार

बेरोजगारीची भीती

असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं.

पाठपुरावा करा

राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी.

कशी झाली घटना?

औरंगाबाद जवळील करमाड येथील सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन शुक्रवारी पहाटे परराज्यातील १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व मजूर हे जालन्यातील एका खासगी कंपनीत कामाला होते. गुरूवारी रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. भुसावळला जाऊन स्पेशल ट्रेनने ते मध्य प्रदेशात जाणार होते. तब्बल ४५ किलोमीटरचा प्रवास करून ते सर्वजण करमाड इथं पोहोचले होते. 

पायी चालून थकलेले हे मजूर करमाड गावाजवळील रेल्वे रूळावरच थांबले. तिथंच त्यांना झोप लागली. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून आलेल्या मालगाडीचा कुठलाही अंदाज न आल्याने झोपेच्या अधीन झालेले हे १६ मजूर मालगाडीच्या खाली येऊन चिरडले गेले. यांत १६ जण जागीच ठार झाले, तर ३ जण गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा - औरंगाबाद रेल्वे अपघात: मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची घोषणा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा