Advertisement

coronavirus update: महाराष्ट्रात ‘या’ पळवाटेने येताहेत कोरोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिली विमानतळाला भेट

महाराष्ट्रात वेगवेगळ्या वाटांनी कोरोनाचे रुग्ण प्रवेश करत असल्याने सरकारसमोरील डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं आहे.

coronavirus update: महाराष्ट्रात ‘या’ पळवाटेने येताहेत कोरोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिली विमानतळाला भेट
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाबाधीतांची (Coronavirus,) संख्या वाढून आता ४९ वर गेली आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधीत रुग्ण हे महाराष्ट्रातील असल्याने सरकारी यंत्रणेची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या वाटांनी कोरोनाचे रुग्ण प्रवेश करत असल्याने सरकारसमोरील डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं आहे.

 हेही वाचा- Coronavirus Updates: अनावश्यक गर्दी टाळा, ट्रेन, बस बंद करण्याची वेळ आणू नका- मुख्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी महाराष्ट्रातील कोरोनाबाधीतांच्या (COVID-19) स्थितीची प्रसारमाध्यमांना माहिती दिली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. मागील १२ तासांत कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले असून ४८ वा रुग्ण २२ वर्षांची महिला, तर ४९ वा रुग्ण ५१ वर्षांचा पुरुष आहे. तो अहमदनगरचा असून, तो दुबईतून आल्याचं टोपे म्हणाले. कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण ५० मध्ये १० आहेत. संसर्ग होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

पण मुळात प्रश्न असा निर्माण होतोय की महाराष्ट्रात इतक्या वेगाने कोराेनाचा प्रसार कसा झाला? तर त्याचं उत्तर हेच आहे की जे प्रवासी कोरोनाबाधीत देशांमधून महाराष्ट्रात आले होते, त्यांनी सुरूवातीला आपली माहिती लपवून ठेवली. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची लागण झाली. काही कोरोनाचे संशयित हातावर शिक्का असून देखील सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना आढळून आले आहेत. त्यापैकी ४ जणांना पालघर आणि ६ जणांना औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं. तर काही कोरोना संशयित भीतीनेच रुग्णालयातून पळाले, त्यांच्यापासूनही इतरांना कोरोनाचा धोका निर्माण झाला.

केंद्र सरकारने १२ करोनाबाधीत देशांची यादी तयार केली या देशांतून भारतात येण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे. पळवाट म्हणून स्पेन, जर्मनी किंवा फ्रान्समधील व्यक्ती भारतात येण्यासाठी व्हाया नेदरलँडमधून येत असल्याने त्यांची केवळ तपासणी करून सोडून दिलं जात आहे. त्यांना होम क्वारटाइंनची सक्ती केली जात नाही. यासंदर्भात हवाई वाहतूक उड्डाण मंत्र्यांशी बोलणं झाल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

 हेही वाचा-Coronavirus Update: आपण फेज २ मध्ये, पुढचे १० दिवस खूप महत्त्वाचे - आरोग्यमंत्री राजेश टोपे

दरम्यान, टोपे यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन तिथं कार्यरत असलेल्या प्रवाशांचं स्क्रिनिंग करणाऱ्या डाॅक्टरांच्या टीमसोबतच चर्चा केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा