Advertisement

अाता विनापरवाना ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्यांवर होणार कारवाई


अाता विनापरवाना ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्यांवर होणार कारवाई
SHARES

परवाना नसताना राज्यात ऑनलाइन सट्टा करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसंच त्यांची वेबसाईट तात्काळ ब्लॉक केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी गेम किंग इंडिया या कंपनीमार्फत ऑनलाईन सट्टा चालविल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. रणजित पाटील म्हणाले, ऑनलाईन सट्टा याबाबतची माहिती सायबर सेलकडून घेण्यात येईल. तसंच याबाबत केंद्र शासनाकडून माहिती मागविण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल. सर्व ऑनलाईन लॉटरीसंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार केला जाईल.


गेमिंग किंग अचल चौरसिया पोलिसांचा जावई आहे का ?

गेम किंग इंडिया या नावाने ऑनलाईन साखळी सट्टा चालवून दररोज कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अचल चौरसिया मुंबईत येऊन जातो. मात्र त्याला मध्य प्रदेश पोलीस अटक करतात, मग महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई आहे का? असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.


सट्टाप्रकरणात पोलिसांचाही सहभाग

दरम्यान, या सट्टाप्रकरणात असलेल्या सिनिअर पोलिसांची मी नावे देतो किंवा माझ्यासोबत तुम्ही चला, असे कितीतरी गेम तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्यासोबत असलेले पोलिस दाखवतो. त्यांना निलंबित करणार आहात का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी केला.


नवीन कायदा अाणणार का?

सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत नवीन कायदा आणणार का? त्या कायद्यात अजामीनपात्र गुन्ह्यांची नोंद व्हावी आणि त्यात कठोर शिक्षा असणार का? अशी मागणीही मुंडे यांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा