Advertisement

महसूलमंत्र्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक


महसूलमंत्र्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक
SHARES

देशात आणि राज्यात निवडून आलेल्या मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना सोशल मीडियाचा करिश्मा काय असतो हे लक्षात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकारमधील बहुतांश मंत्री ट्विटर, फेसबुक यांसारख्या प्रत्येक सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसून आले. मात्र बुधवारी सुरक्षित इंटरनेट डे च्याच दिवशी अनेक दिग्गज मंडळींचं ट्विटर हॅक झाल्याच्या बातम्या आल्या. ज्यात राज्याचे महसूल आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचंही नाव होतं.


यांचंही ट्विटर हॅक

'माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यामुळे माझ्या अकाऊंटवरून कोणत्याही प्रकारच्या पोस्टनां केलं गेलेलं लाईक अथवा रीट्वीट ग्राह्य धरले जाऊ नये. यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून दिली. अद्याप ते पूर्ववत झाली नसल्याची माहिती मिळतेय. याचसोबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, भाजपचे सरचिटणिस राम माधव आणि राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं.


यांचंच असं मग सर्वसामान्यांचं काय?

चंद्रकांत पाटील यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याच्या माहितीत अनेक मजेशीर रिट्विटही करण्यात आलेत. हीच खरी डिजिटल इंडियाची सुरुवात म्हणून सरकारच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेची खिल्ली एका रिट्विटमध्ये उडवण्यात आली. तर ट्विटरचं सोडा दादा बेरोजगारी वाढलीय, नोकऱ्या काढा नोकऱ्या म्हणून एका नेटकऱ्याने सरकारला थेट आव्हानच केलं. तसंच डिजिटल इंडियामध्ये मंत्र्यांचेच अकाऊंट सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य काय अपेक्षा करणार, अशी चिंताही एका ट्विटमधून व्यक्त करण्यात आली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा